breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

भाजपा नेते आमदार लक्ष्मण जगताप याचे सूचक ट्विट : म्हणतात…आगे आगे देखो होता है क्या!

  • शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा भाजपामध्ये प्रवेश
  • पिंपरी-चिंचवड शिवसेनेत भूकंप; पाच नगरसेवक फुटणार?

 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शिवसेना जिल्हा प्रमुख गजानन  चिंचवडे यांची आपल्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत बुधवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. शहराचे नेते आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश मुंबई झाला. त्यानंतर थोड्या वेळातच आमदार जगताप यांनी सूचक ट्विट केले आहे. जगताप म्हणतात की,…आगे आगे देखो होता है क्या..! त्यामुळे जगताप शहराच्या राजकारणात आगामी काळात कोणती उलथापालथ करणार? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शिवसेनेत खळबड उडवून देणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते अमोल कलाटे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

मुंबई येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिंचवडे यांनी कमळ हाती घेतले. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, संघटन सरचिटणीस अमोल थोरात आदी उपस्थित होते.

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button