ताज्या घडामोडीपुणे

भाजपच्या वतीने विशेष मतदार नोंदणी अभियान सुरु

पुणे | भारतीय जनता पार्टी वडगाव शहर यांच्या वतीने मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. वडगावच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या हस्ते व पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर, शहराध्यक्ष अनंता कुडे यांच्या उपस्थितीत या विशेष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. मतदार यादीतील नावांची दुरुस्ती, नाव वगळणे, नाव स्थलांतर करणे आदी कामे यामध्ये करण्यात येणार आहेत.भारत निवडणुक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार सुरू करण्यात आलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत वडगांव शहर भाजपाच्या वतीने विशेष मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. वडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे यांच्या हस्ते या विशेष अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी वडगांव नगरपंचायचे गटनेते दिनेश ढोरे,विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर,विद्यमान नगरसेवक प्रविण चव्हाण,किरण म्हाळसकर,सुनिता भिलारे, माजी अध्यक्ष किरण भिलारे, माजी नगरसेवक ॲड विजय जाधव, प्रसाद पिंगळे,माजी सरपंच नितीन कुडे, माजी उपसरपंच संभाजी म्हाळसकर,सुधाकर ढोरे,नंदकुमार दंडेल, प्रदीप बवरे,भुषण मुथा,मकरंद बवरे,संपत म्हाळसकर,रमेश ढोरे,शेखर वहिले, श्रीकांत चांदेकर, विकी म्हाळसकर यांच्यासह वडगांव शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी वडगाव शहर यांचे वतीने ‘एक हात मदतीचा, प्रशासनाला सहकार्याचा’ या अनुषंगाने नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादीतील नावांची दुरुस्ती, नाव वगळणे, नाव स्थलांतर करणे इत्यादी बाबत कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वडगाव शहरातील सर्व नागरिकांनी मंगळवार दि 30 नोव्हेंबर या कालावधीत सदरील मतदार नोंदणी स्थळास भेट देऊन आपले नाव मतदार यादीमध्ये आहे का याची खात्री करावी असे आवाहन मावळ तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केले आहे.

तसेच 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे वय पुर्ण होणा-या सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदणी करून घ्यावे. असे आवाहन माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर व नगरसेवक प्रविण चव्हाण यांनी केले आहे.

यासाठी आवश्यक कागदपत्रे – फोटो, आधारकार्ड /पँनकार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स (यापैकी एक), लाईटबील/रेशनकार्ड/बँक पासबुक (यापैकी एक) इत्यादी कागदपत्रे घेऊन कार्यक्रम स्थळी जमा करून, सदर अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुषण मुथा केले तर आभार मकरंद बवरे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button