breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

वाढदिवस म्हणजे समाजसेवेची संधी: भाजपा उप शहराध्यक्ष किरण पाटील

  • – प्रभाग क्रमांक १२ मध्ये जन्मदिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम

पिंपरी । प्रतिनिधी

समाजात राहत असताना सामाजिक बांधिलकी जोपासणे तितकेच महत्वाचे आहे. वाढदिवस हा प्रत्येकासाठी महत्वाचा दिवस असतो. मात्र, वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्च न करता समजला लोकोपयोगी उपक्रम राबवल्यास हा सुवर्णदिवस नक्कीच सार्थकी लागतो. यामुळे समाजसेवेची संधी समजून वाढदिवस साजरा करावा, असे मत प्रभाग क्रमांक १२ येथील भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष किरण पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरासह, नागरिक आणि निराधारांसाठी अनेक उपक्रम राबवत प्रत्यक्ष कृतीतून जनसेवेचा संदेश दिला.पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून २१ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२१ दरम्यान शासनाच्या योजना तुमच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, महापौर युद्ध उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव धाके, नगरसेवक एकनाथ पवार, मा नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर, स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष संकेत चोंधे, स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, युवा मोर्चा उपाध्यक्ष शिवराज लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या शितल वरणेकर, महिला कोषाध्यक्ष अस्मिता भालेकर, दादा सातपुते, शिरीष उत्तेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ‘आयुष्यमान भारत’ योजना, ई श्रम कार्ड नोंदणी करण्यात आली. यासह महिलांना मोफत चारचाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण व ड्रायव्हिंग लायसन्स, विधवा व घटस्फोटित महिलांना व्यवसाय अर्थसहाय्य, कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना अर्थसहाय्य, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, उचशिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाअर्थसहाय्य, पंडित दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, बेटी बचाओ-बेटी पाढाओ योजना, मागसवर्गीय कल्याणकारी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व इतर कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्या राबविण्यात आल्या.
त्याचबरोबर महाआरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्टार हॉस्पिटल आकुर्डी, श्वास हॉस्पिटल, क्रिसना डायगोनोस्टिक, देवयानी हॉस्पिटल या रुग्णालयांनी सहभाग घेतला. शिबिरात मधुमेह तपासणी, किडनी विकार, हृदयरोग तपासणी, हाडांसाचे विकार तपासणी, डोळे तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबारामध्ये १५०० नागरिकांनी नोंदणी करून त्यातील २०० नागरिकांना कार्ड चे वाटप करण्यात आले. तसेच पुढील तीन ते चार दिवसात शिल्लक कार्डवाटप करण्यात येणार आहे. दरम्यान या उपक्रमाचे पक्षाच्या पदाधीकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.

 

  • वाढदिवस हे फक्त निमित्त !

कोरोना काळ असेल किंवा त्यानंतरची परिस्थिती असेल नेहमीच नागरिकांना मदतीचा हात देऊन लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. तसेच वाढदिवस हे फक्त निमित्त असून १२ महिने आणि ३६५ दिवस समाजासाठी काम करत राहणार आहे. नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असून कोणत्याही स्वरूपाची अडचण, तक्रार किंवा मदतीची गरज असल्यास मला संपर्क करू शकता. प्रभागाच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button