breaking-newsTOP NewsUncategorizedक्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

Bird Flu | धोनीलाही बर्ड फ्लूचा फटका; हजारो कडकनाथ कोंबड्या नष्ट केल्या

बर्ड फ्लूने देशातील विविध भागांमध्ये दहशत पसरवली असताना या बर्ड फ्लूचा फटका क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यालाही बसला आहे. क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर भारतीय संघातील खेळाडू महेंद्र सिंह धोनी, यानं त्याच्या रांची येथील फार्महाऊसवर सेंद्रीय शेती, कुक्कुटपालन व्यवसायात उडी घेतली. एकिकडे त्याच्या शेतात पिकलेल्या भाज्यांना बाजारात चांगली मागणी आहे, तर दुसरीकडे मात्र बर्ड फ्लूच्या साथीनं त्याला फटका बसला आहे.

झारखंडमध्ये असणाऱ्या धोनीच्या पोल्ट्री फार्ममधील 2500 कडकनाथ कोंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत. धोनीकडे असणाऱ्या काही कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू असल्याचं निष्पन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वीच धोनीच्या पोल्ट्री फार्ममधील काही कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील काही नमुने भोपाळमधील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. जिथं या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळं झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button