TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलांना प्रशिक्षण न देताच ठेकेदाराला कोट्यवधींचे बिले अदा; भाजप नगरसेविकेचा आरोप

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने पंडीत दिनदयाल उपाध्याय-महिलांसाठी ज्ञानकौशल्य वाढ कार्यक्रमाअंर्तगत विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. प्रत्यक्ष प्रशिक्षण न देताच अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या ठेकेदार एजन्सीला कोट्यवधींचे बिले अदा करण्यात आल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी केली.

नगरसेविका बारणे म्हणाल्या, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेने अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थ या खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. या योजनेत इंटेरिअर डिझाईन व डोकेरोशन, हेअर स्पा, हेअर स्टाईल व मेकअप ब्युटीशियन, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, इन्स्टंट फ्रूड, इंग्रजी संभाषण, फॅशनेबल ड्रेस डिझायनिंग, फायबर ग्लास, बाल संगोपन, पोषक आहार व आरोग्य, कार्यक्रम व्यवस्थापन, मेणबत्ती बनविणे, कोरोना संवेदनशीलता व जागरूकता, वृद्धांसाठी कोरोना स्वयंसेवक, कोरोना प्रशिक्षित मोलकरीण आदींचे 7 ते 75 दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते.

त्यासाठी महापालिका प्रत्येक महिलेसाठी एजन्सीला शुल्क अदा करते. एक एप्रिल 2020 ते 31 एप्रिल 2021 या गेल्या वर्षभरात त्यापोटी महापालिकेने एकूण 57 कोटी 10 लाख 1 हजार 425 रूपयांचे बिल संबंधित एजन्सीला अदा केले आहे. प्रशिक्षण न देताच ही बिले अदा करण्यात आली आहेत. त्यासाठी बोगस लाभार्थ्यांची यादी दिली गेली आहे. त्यासंदर्भात सविस्तर माहिती वारंवार मागूनही नागरवस्ती योजना विभागाकडून दिली जात नाही, असा आरोप नगरसेविका बारणे यांनी केला आहे. या प्रकरणी सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button