breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

२७ वर्षांच्या संसारानंतर बिल गेट्स आणि मेलिंडा घेणार घटस्फोट

नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघे एकत्र राहू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयाने सोमवारी संपूर्ण जगाला धक्का बसला.

बिल यांनी सोशल मीडियावर ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. ‘बऱ्याच चर्चेनंतर आणि आपल्या नात्यावर बरेच काम केल्यानंतर आता आम्ही लग्नबंधनातून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील २७ वर्षांमध्ये आम्ही आमच्या तीन मुलांना एकत्र वाढवले’, असे त्यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वाधिक मोठ्या समजल्या जाणाऱ्या बिल ॲंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेसाठी हे दोघेही एकत्र काम करणे सुरूच ठेवणार आहेत.

दरम्यान, $100 billion इतके वार्षिक उत्पन्न असणाऱ्या बिल गेट्स यांच्या नावाचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता. त्यांची आणि आणि मेलिंडा यांची पहिली भेट १९८७ साली झाली होती. त्यावेळी मेलिंडा यांनी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सन १९९४ मध्ये या दोघांनी हवाई बेटांवरील लानी बेटावर लग्न केलं होतं.

आता बिल आणि मेलिंडा यांनी सिएटलमधील किंग काऊण्टी सुपिरियर कोर्टात दाखल केलेल्या संयुक्त याचिकेमध्ये ‘आम्ही कारण सांगू शकत नाही मात्र हे लग्न मोडावं लागत आहे’, असे म्हटले आहे. तसेच आमची तिन्ही मुलं सज्ञान आहेत असेही म्हटले आहे. या दोघांचा सर्वात धाकटा मुलगा नुकताच १८ वर्षांचा झाला आहे. त्याचबरोबर दोघांनाही या अर्जामध्ये संपत्तीचे वाटप कसे होणार याबद्दल एकमत झाल्याचे म्हटले आहे. मात्र संपत्तीच्या वाटपासंदर्भातील सविस्तर तपशील त्यांनी दिलेला नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button