breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

बिग बॉस मराठी ३ : घरातून आविष्कार दारव्हेकर बाहेर!

मुंबई – बिग बॉस मराठी ३च्या घरात आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. रविवारी झालेल्या बिग बॉसच्या चावडीत आविष्कार, स्नेहा, सोनाली आणि गायत्री डेंजर झोनमध्ये आहेत असे महेश मांजरेकरांनी सांगितले. त्यामुळे आता या चार जणांमधून कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. अखेर आविष्कार दारव्हेकरला या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जावे लागले. तर घरात दुसरी वाईल्ड कार्ड एंट्री झाली. अभिनेत्री नीथा शेट्टी-साळवी घरात आली.

त्यामुळे आता हिच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलणार? ती कोणत्या गृपमध्ये जाणार? की स्वतंत्र तिचा खेळ खेळणार? कसा असणार नवा सदस्यासोबतचा नवा आठवडा? कोणते सदस्य होणार नॉमिनेट? कोणकोणते नवे टास्क घरात रंगणार? हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा बिग बॉस मराठी सिझन ३ सोमवार ते रविवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर.

दरम्यान, आपण सगळेच दर आठवड्यात वाट बघत असतो ती म्हणजे बिग बॉसची चावडी कधी भरणार याची. या आठवड्यात कोणकोणत्या सदस्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब लागणार? हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचे होते. महेश मांजरेकर या चावडीवर सदस्यांना ते कुठे चुकले हे सांगतात याचसोबत कोणता सदस्य चांगला खेळला हेदेखील सांगतात. कानउघडणी करतात, कौतुकाची थाप देतात, त्यांना सल्ले देतात. या आठवड्यात बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी विशाल निकमची शाळा घेतली. त्याचे टास्कदरम्यानचे वागणे भीषण दिसले असे सांगत त्यांनी विशालला खडेबोल सुनावले, तर मीनलला सल्ला दिला. याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फॅन्सची चुगली चुगली बूथद्वारे सोनाली, मीरा, गायत्री आणि जयला दाखविण्यात आली. तर दादूस आणि तृप्तीताईंनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button