ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईच्या कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा; सोमय्यांचा सेनेवर आरोप

मुंबई | सध्या कोरोनाचा उद्रेक सुरु असतानाच किरीट सोमय्या यांनी गौप्यस्फोट केला आहे. मुंबईतील कोविड सेन्टरच्या उभारणीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने मोठा घोटाळा केला असून वरळीमधील कोविड सेंटरचे काम बेकायदेशीररीत्या महापौराच्या मुलाला देण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मुंबईतील दहा कोविड सेंटरचे फोरेन्सिक ऑडीट करून दाखवावे असे जाहीर आव्हान त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिले आहे. इतकेच नव्हे तर कोविड सेंटर हे ठाकरे सरकारच्या कमाईचे साधन बनले आहे आणि सध्या ठाकरे सरकार गांजाचा ट्रेड मार्क बनले आहे असा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला आहे.महापौरांनी मात्र सोमाय्यांचे आरोप फेटाळताना सोमय्या सारखी भरसटलेली माणसे आता संपूर्ण जगाला कळलेली आहेत त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहिलेलेच बरे असे म्हटले आहे.

आज किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील कोविड सेन्टरच्या उभारणीत कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला याची माहिती दिली. ते म्हणाले “मुंबईतील वरळीमध्ये असलेल्या कोविड सेन्टरच्या उभारणीचे काम महापौरांचा मुलगा साई प्रसाद पेडणेकर याच्या क्रिश कंपनीला देण्यात आले. ज्याला वैद्यक क्षेत्रातील कोणताही अनुभव नाही अशा कंपनीला कसे काय कोविड सेंटरचे कंत्राट दिले जाऊ शकते असा सवालही त्यांनी केला. विशेष म्हणजे अगोदर कंत्राट दिले आणि नंतर त्या कंपन्या अस्तित्वात आल्या या प्रकरणाची माहितीची कागदपत्रे मिळवण्यासाठी मी गेले दोन महिने प्रयत्न करतोय पण ती देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. पण मी सोडणार नाही या कोविड सेंटरचा संपूर्ण भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणणारच.”

ते पुढे म्हणाले की, मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय असे सांगून मुंबईकरांना घाबरवरले जातेय. पण प्रत्यक्षात मी जेंव्हा कोविड सेंटरची पाहणी करायला गेलो तेव्हा तिथे २५ टक्केही रुग्ण आढळले नाहीत. दहिसरच्या कोविड सेंटर मध्ये निम्मे बेड रिकामी आहेत. मग कोरोना रुग्ण वाढलेत कोरोना रुग्ण वाढलेत अशी बोंब का मारली जाते? पालिका आयुक्त आणि महापौर सुद्धा म्हणाल्या होत्या कि मुंबईतील कोरोनाचा आकडा २० हजारच्या पुढे गेला तर कठोर निर्णय घ्यावा लागेल मग आता मुंबईतील रुग्णाचा आकडा २० हजारच्या पुढे गेलेला असताना गप्प का? काय लपवा छापवी चालू आहे? ते मुंबईकरांना कळायला हवे. मुंबईकरांना फक्त भीती दाखवून कोविड सेंटर वाढवले जात आहेत आणि त्यात घोटाळे केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या डाव्या उजव्या हाताना फायदा होईल अशा प्रकारे कोविड सेंटरची कंत्राटे दिली जात आहेत, म्हणूनच माझे उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की हिम्मत असेल तर मुंबईतील १० कोविड सेंटरचे फोरेन्सिक ऑडीट करून दाखवा.

सोमय्या यांच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा कोविड सेंटर मधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button