breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी : बोपखेल वासियांवर दाखल असलेले गुन्हे कमी होणार!

  •  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आश्वासन
  •  राष्ट्रवादीच्या सरचिटणीस शिल्पा बिडकर यांचा पाठपुरावा

पिंपरी । प्रतिनिधी

सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षा विभागाने बोपखेलचा रस्ता सन 2015 साली अडवला. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात शेकडो महिला, पुरुष आणि मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व गुन्हे कमी करण्याचे आश्वासन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या प्रदेश सरचिटणीस शिल्पा बिडकर यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घडवून आणण्यात मोलाचं सहकार्य केलं. त्यांच्या प्रयत्नातून बोपखेल गावाचे भाग्यदेव घुले, दत्ता घुले, दत्तात्रय घुले, रोहिदास जोशी, अमित टिळेकर, मारुती मोरे आदींनी गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घेतली.

9 मे 2015 रोजी सुरक्षा विभागाने बोपखेल गावचा रस्ता बंद केला. आपल्या हक्काचा रस्ता बंद झाल्याने बोपखेलचे नागरिक संतप्त झाले. त्यांनी याबाबत आंदोलन उभारले. दरम्यान आंदोलन चिघळले. 74 महिला, 102 पुरुष आणि 13 लहान मुलांवर या प्रकरणात गुन्हे दाखल झाले. आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले असून त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे माफ करण्यासाठी भाग्यदेव घुले यांनी शिल्पा बिडकर यांची भेट घेतली.

शिल्पा बिडकर यांनी विषय समजून घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याची भेट घेण्याचा सल्ला दिला. शिल्पा बिडकर यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांची आणि बोपखेल ग्रामस्थांची भेट घडवून आणली. ग्रामस्थांनी गृहमंत्र्यांपुढे आपली कैफियत मांडली असता वळसे पाटील यांनी बोपखेलच्या ग्रामस्थांवर दाखल असलेले गुन्हे माफ करण्याचे आश्वासन दिले. या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी लक्ष घालण्याचे तसेच नागरिकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पुढील कार्यवाही करावी, असेही गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.

  • बोपखेलला होणार नवीन पोलीस चौकी…

बोपखेलचा परिसर दोन पोलीस ठाण्यांमध्ये विभागण्यात आला आहे. बोपखेलचा काही भाग भोसरी पोलीस ठाण्यात तर काही भाग दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. बोपखेलसाठी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्यासाठी आपण लवकरच सूचना देणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बोपखेलच्या ग्रामस्थांना सांगितले आहे. त्यामुळे आता बोपखेलचा संपूर्ण परिसर या चौकीच्या हद्दीत येणार आहे. याचा बोपखेलकरांना फायदा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button