TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणे

रासे येथे मोठी कारवाई! काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी चोरलेला एक कोटी दहा लाखांचा गॅससाठा जप्त

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने रासे येथे मोठी कारवाई केली आहे. गॅसच्या टँकरमधून गॅस चोरी करून तो काळ्या बाजारात विकण्यासाठी साठवला असता त्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली. पोलिसांनी तिघांना अटक करत तब्बल एक कोटी दहा लाखांचा गॅस साठा जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) मध्यरात्री करण्यात आली.

नरसिंग दत्तू फड (वय 31, रा. धसवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), अमोल गोविंद मुंडे (वय 28, रा. वागदरवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड), राजु बबन चव्हाण (वय 52, रा. रासे, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन लोंढे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरसिंग आणि अमोल यांना इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई येथून रासे चाकण येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचा गॅस टॅंकर आणण्याबाबत परिवाहक म्हणून नेमले आहे. त्या दोघांनी मुंबई येथून रासे चाकण येथील इंडियन ऑइल प्लांटवर गॅसने भरलेला कॅप्सूलच्या आकाराचे दोन टँकर चाकण येथे घेऊन जाणे क्रमप्राप्त असताना ते टाळले. तसेच जाणीवपूर्वक वाहतुकीदरम्यान दोन गॅस टँकर मधून गॅस काढून घेण्यासाठी आरोपी राजू याला संमती दिली. राजू याने त्याच्याकडील गॅस कनेक्टरच्या सहाय्याने गॅस टॅंकर मधील गॅस चोरून घेतला. चोरीचा गॅस काळ्याबाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने, मानवी जीवन धोक्यात येईल अशा प्रकारच्या हयगयीने तो साठवून ठेवला. याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास कारवाई करत तब्बल 1 कोटी 10 लाख पाच हजार 145 रुपये किमतीचा गॅस जप्त केला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button