पिंपरी चिंचवड| पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १२ रुपीनगर येथील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या कामांचा भूमिपूजन समारंभ गुरुवार दि.१० रोजी नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या फंडातून या कामासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी खासदार कोल्हे यांच्या कडे येथील रस्त्या बाबत विशेष पाठपुरावा केला होता. या रस्त्यामुळे अनेक दिवसांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या येथील नागरिकांची सोय होणार आहे.
यावेळी बोलताना खासदार डॉ कोल्हे म्हणाले की, रुपीनगर तळवडे परिसर हा रेडझोनबाधित असल्याने या ठिकाणी विविध विकास कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधीना अडथळा येत आहे. तरीही येथील लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे जनतेची सेवा करत आहेत. नागरिकांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता महापालिके मध्ये आणली तर नक्कीच अनधिकृत बांधकामे, शास्तीकर असे विविध प्रश्न नक्कीच मार्गी लावू. बैलगाडा शर्यतीचा प्रश्न आपण मार्गी लावला त्याप्रमाणे येथील रेडझोनचाही प्रश्न मार्गी लावू असे यावेळी कोल्हे म्हणाले.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यावर अनधिकृत बांधकामे ,शास्तीकर आदी प्रश्न प्रामुख्याने सोडविले जातील असे सांगून प्रभागातील नगरसेवकांच्या कामांची स्तुती केली
यावेळी बोलताना नगरसेवक प्रविण भालेकर म्हणाले, प्रभाग क्रमांक १२ हा रेडझोन बाधित असल्याने या ठिकाणी महापालिके कडून तुटपुंजा निधी उपलब्ध होत आहे. निधी अभावी याठिकाणी डी पी रस्त्यांची व इतर मोठी विकासकामे प्रलंबित आहेत. यासाठी रेडझोन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांना केली. नागरिकांसाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते विशेष निधीतून उपलब्ध करून दिल्या बद्दल खासदारांचे आभार मानले.
या भूमिपूजन समारंभप्रसंगी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे ,महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट , राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख , नगरसेविका पोर्णिमा सोनवणे ,नगरसेवक पंकज भालेकर, धनंजय भालेकर , सूर्योदय फौंडेशन चे संस्थापक बाबू शेट्टी , अहिल्या देवी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गजानन वाघमोडे ,सा. कार्यकर्ते शरद भालेकर ,रवींद्र सोनवणे, रंगनाथ भालेकर,अंकुश नखाते,सुधाकर दळवी,वसंत सावंत,विलास भालेकर,राहुल भालेकर,राजू खटावकर,रवी सरवदे,सतिश कंठाळे,रासपा भोसरी विधानसभा अध्यक्ष राजाभाऊ धायगुडे ,अब्दुल मुकरताल , संभाजी भालेकर,सुनिल भालेकर,पंकज आवटे, अजित भालेकर ,दीपक जाधव, खंडू सगळे , चंद्रशेखर कडलग अल्पसंख्याक विभागाचे संजय शेख , अरुण थोपटे , अकबर शेख ,रहीम शेख, रामभाऊ पडघन ,प्रवीण पोकळे, शामराव भालेकर, सागर भालेकर ,गणेश भालेकर , राहुल भालेकर, अरविंद साळुंखे, विक्की भालेकर , पंढरी गरुड, गोपीनाथ बाठे , सुनील बनसोडे,दत्ता करे, आकलाक शेख,नबी पठाण तसेच परिसरातील महिला बचत गटाच्या महिला ,यांच्यासह रुपीनगर तळवडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक प्रविण भालेकर युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी केले.