breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत महापालिका उभारणार 5 एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र ; 13 कोटी 15 लाखांचा खर्च

पिंपरी | प्रतिनिधी 
भोसरी परिसरातील स्पाईन रस्त्याच्या दक्षिण भागातील सर्व निवासी, औद्योगिक क्षेत्र तसेच दिघी, भोसरी, चक्रपाणी वसाहत, सद्गुरुनगर परिसरातील मैलापाणी सुमारे 7 ते 9 किलो मीटर अंतरावरील कासारवाडीतील मैलाशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. हे अंतर जास्त असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या बाजुच्या 4 हजार चौरस मीटर जागेवर 5 एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र (एसटीपी) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 13 कोटी 15 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता घेण्यासाठीचा प्रस्ताव 20 जानेवारी रोजीच्या ऑनलाइन होणा-या महासभेसमोर ठेवला आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेची स्वत:ची सांडपाण्यावर प्रक्रीया करणारी केंद्रे आहेत. महापालिका हद्दीतील सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रीया करण्यासाठी सद्यस्थितीत एकूण नऊ ठिकाणी 353 दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेचे 14 मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. मैला शुद्धीकरण केंद्रातील पाण्यावर जागेवरच प्रक्रिया करावी. प्रक्रियायुक्त पाणी नैसर्गिक नाल्यात सोडावे असे धोरण महापालिकेने निश्चित केले. त्याचा पहिला प्रयोग भोसरीत केला जाणार आहे.

दिघी व भोसरीच्या पूर्व भागातील सर्व मैलापाणी भोसरी सर्व्हे नंबर 217 येथील पंपिंग स्टेशनला ग्रेविटीने येते. तेथून 1200 मीटर अंतरावरील सर्व्हे नंबर 231 येथील पंपिंग स्टेशनला पाईपलाईनद्वारे येते व तेथे ग्रेविटी, पंपिंगमुळे आलेले सर्व मैलापाणी पुढे आदिनाथनगर मधील (PS1) पंपिंग स्टेशनमध्ये पंपिंग करुन येते. पुढे 850 मीटर पुणे-नाशिक हायवेवरील (PS2) येथे पुन्हा पंपिंगद्वारे येते व ‘बीपीटी’मधून 3100 मीटर अंतरावरील कासारवाडी एसटीपीत शुद्धीकरणासाठी पाठविण्यात येते. हा प्रवास अंदाजे 7 ते 9 किलोमीटर असा होतो. मैलापाणी नेण्यासाठी नागरी भागाची व्याप्ती लक्षात घेता सुसूत्रिकरण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नागरी भागातील दैनंदिन स्वरुपातील कचरा ड्रेनेजमध्ये ब-याच अंशी टाकला जातो. तो कचरा वाहत येतो. अंतर जास्त असल्याने नलिका वारंवार भरतात. अंतर वाढल्याने नलिका खूप खोलीवर, मोठ्या आकाराच्या टाकाव्या लागतात.

या परिस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी कमी क्षमेतेचे एसटीपी विकसित केले. तर, त्या ठिकाणी जमा होणा-या मैला पाण्यावर प्रक्रिया करुन प्रक्रियापूर्ण झालेले पाणी नैसर्गिक नाल्यास सोडणे शक्य होईल. याच धर्तीवर सर्व्हे नंबर 217 येथे 5 एमएलडी क्षमतेचे एसटीपीचे काम सुरु आहे. यामुळे दिघी, भोसरी पूर्व भागातील नागरिकांची सोय होणार असून आरोग्य विषयक तक्रारी कमी होणार आहेत. चक्रपाणी वसाहत, महादेवनगर, सद्गुरुनगर, भोसरी, धावडेवस्ती या नागरी क्षेत्रातील मैलापाणी भोसरी गावठाण मार्गे आदिनाथनगर (PS1) या भागात नाल्यामधून पाईपलाईनद्वारे नेण्यात येते.

पावसाळ्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरते. नाल्यामधील ड्रेनेजलाईन देखभाल व दुरुस्ती करणे अत्यंत जिकिरीचे होते. त्यामुळे या नागरी भागातील मैलापाण्यासाठी कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह शेजारील उद्यानास लागून उपलब्ध मोकळ्या जागेत 5 एमएलडी क्षमतेचा एसटीपी विकसित केला जाणार आहे. शुद्धीकरण केलेले पाणी सहल केंद्रामधील उद्यानास वापरणे, नाट्यगृहामधील नाल्यास जोडून तळ्यात सोडण्याचा जलनि:सारण विभागाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे आदिनाथनगरमधील नाल्यामध्ये या भागामधील ड्रेनेजचे पाणी बंद होणार असून नाल्यामधील पाईपलाईन हटविणे शक्य होणार आहे.

या कामाचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. पुढील 15 वर्षांची वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन 5 एमलडी क्षमतेच्या एसटीपी प्रकल्पासाठी 4 हजार चौरस मीटर क्षेत्र आवश्यक आहे. नाट्यगृहाच्या बाजुच्या महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागेत तेवढे क्षेत्रफळ उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी बाजुच्या उद्यानाच्या विनावापराचा काही भाग घेता येवू शकतो. प्रकल्पाच्या बांधकामासाठी ढोबळ अंदाजपत्रक तयार केले असून 13 कोटी 15 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात या कामाचा अंतर्भाव नाही. त्यासाठी प्रशासकीय मान्यतेसाठी महासभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे.

तरतुद करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या नियोजित भांडवली कामामधून वाढ-घट करावी लागणार आहे. सन 2021-22 च्या सुधारित अंदाजपत्रकात तसेच सन 2022-23 चे अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करुन काम करणे शक्य होणार आहे. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या बाजुच्या 4 हजार चौरस मीटर जागेवर 5 एमएलडी क्षमेतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र बांधणे आणि या जागेवर मैलाशुद्धीकरण केंद्र विकसित करणे या कामाचा सन 2021-22 च्या अंदाजपत्रकात समावेश करुन अंदाजपत्रकीय 13 कोटी 51 लाखाच्या खर्चास महासभेची प्रशासकीय मान्यता घेतली जाणार आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button