भारताचा पराभव, इंग्लंडचा 10 गडी राखून विजय

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. यावेळी भारताचा वेगवान खेळाडू विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या जोडीने उत्कृष्ट फकटेबाजी करत 168 धावा केल्या. भारताने इंग्लंडला 169 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु भारताचं आव्हान संपुष्टात आलं.
केएल राहुलने केवळ 5 धावा केल्या आणि तो माघारी परतला. तर रोहित शर्माने मात्र 27 धावांची खेळी केली. रोहित शर्माही मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे भारताला दुसरा झटका बसला. सूर्यकुमार यादवही 14 धावांवर बाद झाला. भारतीय संघाने एकूण 168 धावा ठोकल्या होत्या. मात्र, इंग्लंडने तुफान फटकेबाजी करत 16 ओव्हर्समध्ये 170 धावा ठोकल्या आणि सामना सहज खिशात घातला.
दुसरीकडे, क्रिस जोर्डने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. क्रिसमुळेच काही काळ भारतीय संघ दबावात होता. तर क्रिस वोक्सने 2 विकेट घेतल्या. एलेक्स हेल्स आणि जोस बटलर या सलामी जोडीने संघाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयासोबत इंग्लंडने अंतिम सामन्यात तिकीट मिळवलं आहे. आता इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात थेट रविवारी अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे हे जेतेपद कोणता संघ मिळवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.