ताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी घेतली शपथ

चंदिगढ | भगवंत मान यांनी थोर स्वातंत्र्यसैनिक शहीद भगत सिंग यांचे गाव खटकर कलान येथे अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत राज्याचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अशा प्रकारे पंजाबच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे.राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर भगवंत मान यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी भगतसिंग यांच्या देशभक्तीला प्रणाम करत, ते जी लढाई लढले, तीच लढाई आम आदमी पार्टी लढत असल्याचे म्हणाले. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, चळवळीतून उदयास आलेला पक्ष देशात परिवर्तन घडवत आहे. दिल्लीच्या धर्तीवर पंजाबचा विकास करू. पंजाबमधील शाळा आणि महाविद्यालयांचा दर्जा नक्कीच सुधारेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, शपथविधीपूर्वी भगवंत मान यांनी ट्विट केले होते, “सूर्याच्या सोनेरी किरणाने आजची नवी पहाट झाली आहे. शहीद भगतसिंग आणि बाबा साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी त्यांच्या मूळ गावी खटकर कलांकडे रवाना होत आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले होते की, “आजचा दिवस पंजाबसाठी मोठा आहे. नव्या आशेसह समृद्ध पंजाब बनवण्यासाठी होणाऱ्या सोहळ्याच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी मी सुद्धा शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलांकडे रवाना झालो आहे. काल भगवंत मान यांनी शपथ घेतली आहे.

पंजाब विधानसभेच्या ११७ जागांपैकी आपने ९२ जागा जिंकल्या असून, पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काल त्यांनी शपथ घेतली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच पंजाबच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button