breaking-newsआरोग्य

पावसाळ्यात मध खाण्याचे फायदे – Pavsalyat Madh Khanyache Fayde

टीम महाईन्यूज : पावसाळ्यात पोटाच्या आरोग्याची (Stomach Health) अधिक काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या ऋतूत रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्याची (Monsoon Health Tips) गरज असते. यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे सल्ले मिळतात. परंतु आयुर्वेदात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या एका विशेष पदार्थाचा उल्लेख आहे. तो पदार्थ म्हणजे बहुगुणी मध. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात मध (Honey In Monsoon) खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. मध खाल्ल्याने भूक वाढते आणि पचनशक्ती सुधारण्यास (Benefits Of Honey In Monsoon) देखील मदत होते.

मध हा एक आयुर्वेदिक घटक अशून तो सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. मधाला सुपरफूड (Superfood) देखील म्हटले जाते, कारण त्याचे अनेक फायदे आहेत. पावसाळ्यात मधाचे सेवन एखाद्या वरदानापेक्षा कमी नसते. पावसाळ्यात दररोज मध खाल्ल्यास शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते. पावसाळ्यात मधाचे सेवन केल्याने काय फायदे (Benefits Of Honey In Monsoon) होतात हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

पावसाळ्यात मध खाण्याचे फायदे

  • मधात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, एमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट्स हे मुख्य घटक असतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मध जखमेवर, कापल्यास, भाजल्यास उत्तम औषध आहे. यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
  • या हंगामात मध शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. मधाचे सेवन केल्यास संसर्गजन्य रोगांपासून देखील बचाव होतो.
  • घसा खवखवणे आणि सर्दी-तापेपासून आराम मिळवण्यासाठी देखील मध उपयुक्त ठरतो. खोकला दूर करण्यासाठी दोन चमचे मध आणि एक चमचा आल्याचा रस एकत्र करून सेवन करावा.
  • आल्याचा किंवा लिंबाच्या रसात मध घालून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते आणि मळमळ होत असल्यास आराम मिळतो.
  • घसा खवखवत असल्यास किंवा खोकला झाल्यास काळी मिरीसोबत मधाचे सेवन करावे.
  • मधात असलेले पोषक घटक बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील मदत करतात. रात्री कोमट दुधात एक चमचा मध मिसळून प्यायल्याने फायदा होतो.
  • त्वचेसंबंधित समस्या असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा मध घाला आणि ते पाणी प्या. हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला फरक जाणवेल.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button