breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मशिदींवरील भोंग्यांनंतर आता गोमांस लक्ष्य?; त्या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई |

मशिदींवरील भोंग्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर आता गोमांस विक्रीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. स्विगी आणि इतर काही ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून मुंबईत थेट गोमांस विक्री केली जात असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला. संबंधित कंपन्यांच्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. तसे न केल्यास येत्या काळात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

मुंबईत होणाऱ्या गोमांस विक्रीबाबत मनसेचे अंधेरी विधानसभेचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत, मनविसे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर आणि विजय जैन यांनी गुरुवारी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. यावेळी या शिष्टमंडळाने ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून कशा प्रकारे गोमांसाची विक्री केली जाते, याची माहितीदेखील दिल्याचे कळते. सरकारने बंदी घातली असतानाही शहरात खुलेआम गोमांस विक्री सुरू आहे. हे कोणाच्या आशीर्वादाने होत आहे, असा प्रश्न चेतन पेडणेकर यांनी केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button