breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“कोव्हॅक्सिन भारतातील लस असल्याने परदेशी कंपन्यांनी मंजुरी देण्यासाठी अडथळे आणले”; सरन्यायाधीशांनी दिली माहिती

नवी दिल्ली |

भारताने बनवलेल्या कोविड-१९ लसीला मान्यता मिळण्याच्या मार्गात अनेक अडथळे आले आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्याला मान्यता मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडे तक्रारही करण्यात आली होती अशी प्रतिक्रिया भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण यांनी दिली आहे. हैदराबादमध्ये रामेनीनी फाउंडेशन पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गुरुवारी हैदराबाद येथे रामनेनी फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना, भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक. डॉ कृष्णा एम. एला आणि सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एम. एला यांचे औषध विज्ञानाच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले. भारत बायोटेकला रामेनेनी फाऊंडेशनकडून २०२१चा पुरस्कार मिळाला, ज्यात सरन्यायाधीश या कार्यक्रमात सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

“मला लसींबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. विविध अभ्यास सांगतात की कोव्हॅक्सिन प्रभावी आहे आणि अगदी नवीन व्हेरिएंटवर देखील काम करते. पण अनेकांनी त्यावर टीका केली कारण ती भारतात बनवली गेली होती. काहींनी जागतिक आरोग्य संघटनेकडे तक्रारही केली होती. फायझर सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय लसीच्या विरोधात काम केले असताना, देशातही अनेकांनी या लसीला जागतिक मान्यता मिळवण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. एका तेलुगूने जगातील दुसर्‍या तेलुगू व्यक्तीला प्रोत्साहन दिले पाहिजे. आपल्यामध्ये एकतेची गरज आहे हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या तेलुगू भाषा आणि संस्कृतीच्या महानतेचा प्रचार केला पाहिजे,” असे सरन्यायधीश एनव्ही रमण म्हणाले. या फाऊंडेशनने अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ता सोनू सूद यांना समाजासाठी त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल “प्रत्येका पुरस्कारम- २०२०” ने सन्मानित केले.

“भारत बायोटेक म्हणजे इनोव्हेशन आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण जगात आघाडीवर आहोत. सर्व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांनी आपल्या समाजासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना पुरस्कार देताना मला आनंद होत आहे,” असे सरन्यायाधीश म्हणाले. “जसे करोना विषाणूचे अनेक प्रकार आले आहेत, त्यावर भारतीय लस चांगल्या प्रकारे वापरली जात आहे. अनेक कंपन्यांनी भारतीय लसीला मागे टाकण्याचा प्रयत्न केला पण ते यशस्वी झाले नाहीत. आपण आपल्या मातृभूमीचा आदर केला पाहिजे आणि प्रेम केले पाहिजे,” असेही सरन्यायाधीश एनव्ही रमण म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button