TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

ब्युटी पार्लर आणि जिम ५० टक्के क्षमेतेने सुरू ठेवण्यास परवानगी; सरकारकडून सुधारित नियमावली जाहीर

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे काल राज्य सरकारने नव्या कडक निर्बंध नियमावली जारी केली होती. या नियमावलीत सलून 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारच्या या आदेशावरुन ब्युटी पार्लर आणि जीम चालकांत तीव्र नाराजी पसरली होती. नियमांत बदल करुन ब्युटी पार्लर सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनकडून करण्यात आली होती. प्रसंगी आंदोलनाचा इशाराही असोसिएशनकडून देण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने ब्युटी पार्लर आणि जीमवरील निबर्र्ंधांचे सुधारित आदेश जारी करत 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

राज्य सरकारने जीम आणि ब्युटी पार्लरबाबत जारी केलेल्या सुधारित आदेशात म्हटले आहे की, ब्युटी पार्लरचा देखील हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात आहे. यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. हे काम करणार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. याशिवाय ज्या ग्राहकांचे लसीकरण झाले आहे त्यांनाच येथे प्रवेश असेल. त्याचबरोबर जीमही 50 टक्केसंख्येने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र व्यायाम करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच जीममध्ये प्रवेश असणार आहे. जीमचालक आणि कर्मचार्‍यांचेही पुर्ण लसीकरण झालेले असावे, असे सुधारित नियमावलीत म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button