पिंपरी / चिंचवड

वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या महावितरणच्या कर्मचा-यांना मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

वीजबिल थकलेल्या ग्राहकाचे कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. 5) दुपारी मेदनकरवाडी येथे घडली.

सागर विशाल मोहिते (रा. मेदनकरवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजेश शिवाजी पाटील (वय 22, रा. तापकीर चौक, काळेवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेदनकरवाडी येथील वीज ग्राहक पांडुरंग रामभाऊ मेदनकर यांचे वीजबिल थकले होते. त्यामुळे त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यासाठी फिर्यादी राजेश पाटील आणि त्यांचे सहकारी तळपे हे बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास गेले होते. पांडुरंग मेदनकर यांचे वीज कनेक्शन तोडत असताना आरोपी सागर मोहिते तिथे आला. त्याने फिर्यादी यांचे सहकारी तळपे यांना ढकलून दिले. फिर्यादी यांचा शर्ट पकडून त्यांना कानशिलात मारली. ‘तू मीटर कसा काढतो तेच बघतो. इथून तुम्ही निघून जा नाहीतर तुमचे हातपाय काढून टाकीन’ अशी आरोपीने धमकी दिली. फिर्यादी हे करत असलेल्या शासकीय कामात आरोपीने अडथळा निर्माण केला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button