पिंपरी l प्रतिनिधी
मुलाला शिवीगाळ केल्याच्या जाब त्याच्या आईने विचारला असताना तिला मारहाण करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २१ एप्रिल रोजी दुपारी सुसगाव येथे घडली असून याप्रकरणी १२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्चना भगवान पवार, भगवान नाना पवार, लीलाबाई पोपट मोहिते (सर्व रा. सुसगाव, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान याने फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्याचा जाब फिर्यादी यांनी विचारला. त्याचा राग आल्याने भगवान याने फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. त्याने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ देखील केली. अन्य दोन आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.