पिंपरी / चिंचवड

 ‘माझा नवरा पीएसआय आहे, तुला बघतेच’ म्हणत महिलेला मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

‘माझा नवरा पीएसआय आहे. तुला बघतेच’ असे म्हणत दोन महिलांनी एका महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 23) दुपारी अडीच ते साडेतीन वाजताच्या कालावधीत सिद्धार्थनगर, बावधन बुद्रुक येथे घडली.

याप्रकरणी जखमी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची सासू ‘आमच्या जागेत बंघाकाम करू नका’ असे समजावून सांगण्यासाठी आरोपी महिलांकडे गेल्या. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण केली. हे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी यांचे सासरे आणि पती आले असता त्यांना ढकलून आरोपी महिलांनी शिवीगाळ केली.

फिर्यादी यांचे पती आणि सासू घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस चौकीत तक्रार देण्यसाठी गेले. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचे सासरे घरी होते. आरोपी महिला शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या घरात आल्या. त्यांनी दगड फेकून मारला. तसेच फिर्यादी यांचे केस पकडून गरागरा फिरवून मारहाण केली. ‘माझा नवरा पीएसआय आहे. तुला बघतेच’ असे म्हणून आरोपी महिलेने धमकावले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button