पिंपरी / चिंचवड

हिंजवडीत हॉटेल चालकाला बेदम मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी
जेवण देण्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून हॉटेल चालकाला बेदम मारहाण केली. तसेच हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करत हॉटेलमधील दोन टेबलचे नुकसान केले. ही घटना 21 डिसेंबर रोजी सुतारवाडी येथील ऑल इंडिया परमिट हॉटेल येथे घडली.

शशांक सियाराम शरण (वय 35, रा. कोस्टा ब्लॅंका सोसायटी, पॅनकार्ड क्लब रोड, बाणेर) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी इसमांविरोधात गुहा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ऑल इंडिया परमिट नावाचे हॉटेल आहे. 21 डिसेंबर रोजी आरोपी तेथे जेवनासाठी आले. जेवन देण्याच्या काराणाहून तेथे त्यांच्यात वाद झाला. त्या नंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात पार्किंगसाठी ठेवलेला फायबरचा तुकडा मारून त्यांना जखमी केले. हॉटेलच्या सुरक्षा रक्षकास मारहाण केली. तसेच हॉटेलमधील टेबलचे नुकसान केले. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button