टेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

तांत्रिक माहितीच्या आधारे भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलेले सुमारे सव्वा दोन लाखांचे १७ मोबाईल मूळ मालकांना परत

भोसरी : भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ तथा चोरीला गेलेले एकुण १७ मोबाईल फोनचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेवून मूळ मालक, तक्रारदार यांना परत करण्यात आले. यामध्ये वनप्लस, सॅमसंग, ओपो, अशा महागड्या कंपनीचे सुमारे २ लाख २० हजार रुपये किमतीचे १७ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत.

भोसरी पोलीस ठाणे येथे पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-४. पिंपरी चिंचवड यांच्या वार्षिक निरिक्षणा दरम्यान गहाळ तथा चोरी झालेल्या एकुण १७ मोबाईलचे तक्रारदार यांना भोसरी पोलीस ठाण्यात समक्ष बोलावुन परत करण्यात आले. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- १ चे विवेक पाटील यांच्या हस्ते तक्रारदारांना मोबाईल हॅण्डसेट परत देण्यात आलेले आहेत.

सदर कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ चे विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सागर जाधव यांनी मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून सहायक पोलिस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस उपनिरिक्षक मुकेश मोहारे, सहायक फौजदार राकेश बोयणे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, धोंडिराम केंद्रे, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, संतोष महाडिक, तुषार वराडे, सचिन सातपुते, स्वामी नरवडे, महिला पोलीस अंमलदार प्रतिभा मुळे यांनी उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button