सुरज सुभाष मोरे आणि शुभम मिलिंद शिंदे अशी या दोन तरुणांची नावे आहे. हे दोन्ही तरुण अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. सुरजचे वडील सेंट्रींग चे काम करतात तर शुभमचे वडील गॅरेजमध्ये कामाला आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही या दोघांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांनी मिळवलेल्या या यशाचं समाजाच्या विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.