breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सारसबागेतील बाप्पांनीही घातले स्वेटर

पुणे | प्रतिनिधी 
थंडी वाढताच पुण्यातील सारसबाग येथील गणरायानाही स्वेटर परिधान करण्यात आले आहे. स्वेटरमधील बाप्पाचे रूप बघण्यासाठी पुणेकर नागरिक गर्दी करू लागले आहेत. या गणपतीला तळ्यातील गणपती म्हणून ओळखले जाते. या पोशाखात सिद्धिविनायकाचे रुप फार गोमटे दिसते. पुणेकरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या लोकरीच्या पोषाखातील गोमट्या सिद्धिविनायकाचे फार आकर्षण आहे.

सारसबाग सिद्धिविनायक मंदिर किंवा तळ्यातला गणपती याला ऐतिहासिक महत्त्व आहे. १७८४ मध्ये सवाई माधवराव पेशव्यानी या मंदिराची स्थापना केली. १८८२मध्ये पहिली मूर्ती बदलून नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर १९९०साली सध्या असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सध्या महाराष्ट्रातील सर्वात कमी वातावरणाची नोंद पुण्यात आहे. पुण्यात किमान तापमान कमी अंश डिग्री आहे. पुण्यासोबतच नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद येथील तापमान खाली गेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button