breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडीमुंबई

बाप्पा गणराया अज्ञा असावी… चुकलेच काही तर क्षमा असावी… मुंबईत आज बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा उत्साह

मुंबईः गणरायाच्या आगमनानंतर आता बाप्पांना निरोप देण्याच्या तयारीच्या कामात सरकारी यंत्रणा व्यस्त झाल्या आहेत. ९ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बहुसंख्य सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनासाठी सकाळी १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत मुंबईच्या विविध भागांतील एकूण ७४ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. मध्य, पश्चिम, पूर्व मुंबईतील या रस्त्यांवर वाहतुकीस परवानगी नाकारण्यात आली आहे.

* मध्य वाहतूक विभागदादर वाहतूक विभाग

  • रानडे मार्ग : पानेरी जंक्शन ते चैत्यभूमीपर्यंत
  • ज्ञानेश्वर मंदिर मार्ग : चैत्यभूमी ते सीफेसपर्यंत
  • जांभेकर महाराज मार्ग : सूर्यवंशी हॉल ते चैत्यभूमीपर्यंत
  • स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग : सिद्धिविनायक जंक्शन ते एस. बँकेपर्यंत
  • संपूर्ण केळुस्कर मार्ग दक्षिण आणि उत्तर पूर्णपणे बंद
  • संपूर्ण एम. बी. राऊत मार्ग बंद
  • टिळक ब्रिज : कोतवाल उद्यान ते दादर टीटीपर्यंत
  • एस. के. बोले मार्ग : पोर्तुगीज चर्च ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत

माटुंगा वाहतूक विभाग

  • टिळक ब्रिजः हा खोदादाद सर्कल (दादर टी.टी) ते कोतवाला गार्डनपर्यंत, दोन्ही बाजुंनी वाहतुकीस बंद राहील

कुर्ला वाहतूक विभाग

  • एल.बी. एस. रोडः कमानी जंक्शन ते कुर्ला डेपो
  • न्यू मिल रोडः चिकणे चौक ते सहार जंक्शन

* पूर्व उपनगर विभाग

  • चेंबूर वाहतूक विभाग
  • हेमू कलानी मार्गः उमरशी बाप्पा जंक्शन ते बसंत पार्क जंक्शनपर्यंत
  • गिडवाणी मार्गः गिडवाणी मार्ग गोल्फ क्लब ते झामा चौक
  • आर.सी. मार्गः चेंबूर नाक्यापर्यंत

मुलुंड वाहतूक विभाग

  • भट्टीपाडा मार्ग, भांडूप (प): भट्टीपाडा मार्ग हा लालबहादूर शास्त्री मार्ग जं. पासून जंगल मंगल मार्ग जं पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही दिशांकडून वाहतुकीस बंद राहील. हा मार्ग केवळ गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी खुला राहिल.
  • जंगल मंगल मार्ग, भांडूप (प.): जंगल मंगल मार्ग हा लक्ष्मी हॉटेल ते सर्वोदयनगरपर्यंतचा भाग सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही दिशांकडून वाहतुकीस बंद राहील. हा मार्ग केवळ गणेश विसर्जन मिरवणुकांसाठी खुला राहिल.
  • जंगल मंगल रोड/ टेंबीपाडा रोड जंक्शन

(शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद)

  • लालबहादूर शास्त्री मार्ग टँक रोड जंक्शन

(शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद)

  • सर्वोदयनगर जंगल मंगल रोड

(शिवाजी तलावाकडे जाण्यास बंद)

पवई वाहतूक विभाग

  • साकी विहार रोड

* पश्चिम उपनगर विभाग

बोरीवली वाहतूक विभाग

  • एल. टी. मार्ग जंक्शन ते डॉन बॉस्को मार्ग जंक्शनपर्यंत
  • गोराई जेट्टी मार्ग : डॉन बॉस्को मार्ग ते गोराई जंक्शनपर्यंत दोन्ही बाजूस बंद

डी. एन. नगर वाहतूक विभाग

  • सीझर मार्ग : जे. पी. रोड जंक्शन ते एस. व्ही. रोड जंक्शन
  • जे. पी. मार्ग : गंगा भवन ते सागर कुटीरपर्यंत
  • पाच मार्ग : जे. पी. मार्गावरील वटेश्वर मंदिर ते फिशरी मार्गावरील गंगा भवन
  • एम. एच. बी कॉलनी वाहतूक विभाग
  • बाबू बागवे मार्ग : कांदरपाडा तलावाकडून प्रतिमा नगर येथे जाणारा मार्ग
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button