breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

ऑक्टोबर महिन्यात 21 दिवस बँका राहणार बंद

नवी दिल्ली – देशवासियांनो बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या, कारण ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. प्रत्येक राज्यामध्ये या सुट्ट्या वेगवेगळ्या आहेत.

ऑक्टोबर 2021मध्ये नवरात्री, दसरा इतरही सणसमारंभ आणि शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याही आहेत. 1 ऑक्टोबर रोजी गंगटोकमध्ये बँकेच्या काही कामकाजासाठी बँक बंद असणार आहे. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती, 3 ऑक्टोबर रोजी रविवार, 6 ऑक्टोबर रोजी महालया अमावस्या (आगरतळा, बंगळुरू, कोलकाता), 7 ऑक्टोबर रोजी मीका चोरेल होउबा (इंफाळ), 9 ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार, 10 ऑक्टोबर रोजी रविवार, 12 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा (महा सप्तमी) / (आगरतळा, कोलकाता), 13 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा (महा अष्टमी) / (आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पाटणा, रांची), 14 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा/दसरा महा नवमी/आयुथा पूजा (आगरतळा, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम), 15 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा/दसरा/विजया दशमी/(इंफाळ आणि शिमला वगळता सर्व बँका), 16 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा (दशैन)/ (गंगटोक), 17 ऑक्टोबर रोजी रविवार, 18 ऑक्टोबर रोजी कटी बिहू (गुवाहाटी), 19 ऑक्टोबर रोजी -ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलादुन्नबी/मिलाद-ए-शेरीफ /बारावफाट/(अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, कानपूर, कोची , लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअनंतपुरम) 20 ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मिकी यांचा जन्मदिन/लक्ष्मी पूजा/ईद-ए-मिलाद (आगरतळा, बंगळुरू, चंदीगड, कोलकाता, शिमला) 22 ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगर) 23 ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार, 24 ऑक्टोबर रोजी रविवार, 26 ऑक्टोबर रोजी जम्मू, श्रीनगरमध्ये बँक बंद, 31 ऑक्टोबर रोजी रविवार, अशा ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस सुट्ट्या बँकांना आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button