breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कर्ज देण्यास नकार दिल्याने बॅंकेलाच लावली आग; पोलिसांनी केली आरोपीला अटक

कर्नाटक |

बँकेकडून कर्ज घेणे सोपे काम नाही. अनेकवेळा बँक कर्ज देण्यासही नकार देते. पण कर्नाटकातील हावेरीमध्ये एका व्यक्तीने कर्ज देण्यास नकार दिल्याने बँक पेटवून दिली आहे. गेल्या रविवारी ही घटना घडली आहे. कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे नाराज झालेल्या एका व्यक्तीने रविवारी हावेरी जिल्ह्यात बँकेला आग लावली होती. एएनआयच्या वृत्तानुसार, कागिनेली पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ४३६, ४७७ आणि ४३५ अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला कर्जाची गरज होती आणि त्यासाठी तो बँकेत गेला होता. मात्र, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बँकेने त्या व्यक्तीला कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या व्यक्तीने रविवारी बँकेलाच आग लावली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हावेरी जिल्ह्यातील हेडीगोंडा गावातील एका व्यक्तीने कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे नाराज झालेल्या व्यक्तीने शनिवारी रात्री उशिरा बँकेत पेट्रोल ओतून पेटवून दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३३ वर्षीय वसीम हजरतसाब मुल्लाने हेडीगोंडा येथील कॅनरा बँकेच्या शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता. वसीमचा सीआयबीआयएल स्कोअर कमी असल्याने बँकेने कर्जाचा अर्ज नाकारला.

कर्जाचा अर्ज फेटाळण्यात आल्याने वसीम पूर्णपणे निराश झाला होता. या नैराश्यात व निराशेमध्ये वसीमने शनिवारी रात्री बँकेत पोहोचला. तेथे खिडकी तोडून बँकेच्या आत प्रवेश केला. यानंतर त्याने पेट्रोल ओतून बॅंक पेटवून दिली. काही वेळाने धुराचे लोट पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड करायला सुरुवात केली. यानंतर लोकांनी बँकेला आग लागल्याची माहिती स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. गावातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना गावकऱ्यांनी वसीम हजरतसाब मुल्ला यालाही पकडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button