क्रिडा

बांगलादेशने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर पराभूत केले

 

सेंच्युरियन: बांगलादेशच्या संघाने (Bangladesh Cricket Team) तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून इतिहास घडवला. तिसऱ्या वनडेत पाहुण्या संघाने ९ विकेटनी विजय मिळवला आणि मालिका २-१ने जिंकली. मालिकेतील पहिली लढत बांगलादेशने ३८ धावांनी जिंकली होती. तर दुसऱ्या लढतीत द.आफ्रिकेने ७ विकेटनी विजय मिळवला होता.

बांगलादेशच्या क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्याची ही पहिली वेळ आहे. याआधी त्यांना कधीच द.आफ्रिकेत मालिका जिंकता आली नव्हती. याआधीच्या १९ पैकी सर्व लढतीत बांगलादेशचा पराभव झाला होता. द.आफ्रिकेचा संघ शानदार लयीमध्ये होता. त्यांनी जानेवारी महिन्यात भारताचा वनडे मालिकेत ३-०ने क्लीन स्वीप केला होता. त्याआधी कसोटी मालिका देखील जिंकली होती. असे असताना देखील बांगलादेशने शानदार कामगिरी केली आणि ऐतिहासिक विजय साकारला.

 

तिसऱ्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना द.आफ्रिकेचा ३७ षटकात १५४ धावांवर ऑलआउट झाला. सलामीवीर जानेमन मलान आणि क्विंटन डीकॉक यांनी पहिल्या विकेटसाठई ४६ धावा जोडल्या पण त्यानंतर आफ्रिकेचा डाव कोसळला. बांगलादेशकडून तस्कीन अहमदने ३५ धावा देत ५ विकेट घेतल्या. बांगलादेशने विजयाचे लक्ष्य २७व्या षटकात फक्त एका विकेटच्या बदल्यात पार केले. कर्णधार तमीम इकबालने ८२ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या. आता दोन्ही संघांमध्ये ३१ मार्चापासून २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघातील अनेक खेळाडू उपलब्ध असणार नाहीत. हे सर्व खेळाडू २६ मार्चपासून होणाऱ्या आयपीएलच्या १५व्या हंगामात सहभागी होतील.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button