breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

बबनराव लोणीकरांच्या अडचणी वाढल्या; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता

औरंगाबाद |

बंगल्याचे वीजबिल थकल्याने वीज कापणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण भाजप आमदार बबनराव लोणीकरांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण, एकीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असताना, दुसरीकडे काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लोणीकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.

भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचा औरंगाबाद येथे बंगला असून त्यांचे साडेतीन लाख रुपयांचे विजबिल थकले होते. तर वीज बिल थकल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंगल्याचे वीज कनेक्शन कट केले. त्यामुळे संतापलेल्या लोणीकरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोनवरून शिवीगाळ करत झपाझापी केली. त्यांच्या याच तथाकथीत संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यानंतर खुद्द ऊर्जामंत्री यांनी याची दखल घेत, चौकशीचे आदेश दिले आहेत. सोबतच पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेशसुद्धा महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहे. त्यामुळे लोणीकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

  • अ‍ॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी…
    या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण, लोणीकर यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काही संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी केली आहे. औरंगाबादेतील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोघांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त कार्यालयात ही तक्रार दाखल केली आहे.
  • काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये…

या तथाकथित किल्पमध्ये लोणीकर अधिकाऱ्यांना बोलताना, चोरांना पकडत नाही आणि बिल भरणाऱ्याला त्रास देतात. माजले का तुम्ही या शब्दात त्यांनी अभियंत्याला सुनावले. इतकंच नाहीतर तुमच्यावर इनकम टॅक्स धाड करेल, तुमची प्रॉपर्टीची कुंडली काढणार, ऊर्जा मंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करेल अस बबनराव लोणीकर यांनी सुनावले आणि माझं मीटर जोडा अशी तंबीही दिली.

  • लोणीकरांचा दावा…
    या प्रकरणानंतर बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिल आहे. औरंगाबादेत माझा एक बंगला आहे. त्याच बिल भरलं असून विज खंडित झालेली नाही. कोणीतरी खोटी ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर टाकून मला बदनाम करत आहे. सध्या महावितरण करत असलेली कारवाई चुकीची असून त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचं बबनराव लोणीकर म्हणाले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button