Uncategorizedमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

पतंजलीच्या IPO बाबत बाबा रामदेवांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) सतत येत असल्याचे दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक कंपन्या आयपीओ लाँच करत आहेत. यातच आता योगगुरू बाबा रामदेव यांच्या आयुर्वेद कंपनी पतंजलीचे सुद्धा नाव जोडले जाणार आहे. बाबा रामदेव लवकरच पतंजली आयपीओ घेऊन येणार आहेत. या संदर्भात बाबा रामदेव यांनी आधीच संकेत दिले होते, पण आता ईटीला दिलेल्या मुलाखतीनुसार पतंजली आयपीओबाबत या वर्षाच्या अखेरीस निर्णय होण्याची शक्यता आहे.

यावर्षी पतंजली आयपीओ सुरू करण्याची बाबा रामदेव यांची कोणतीही योजना नाही, मात्र सध्याच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस याबाबत निर्णय घेतला जाईल. बाबा रामदेव यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, आम्ही लवकरच पतंजलीच्या आयपीओबाबत निर्णय घेऊ. यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. पतंजली आयपीओबाबत निर्णय या आर्थिक वर्षाच्या अखेरीस घेता येईल. तसेच, ते म्हणाले की, सध्या रुची सोयाच्या 4,300 कोटी रुपयांच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफरच्या (एफपीओ) आधी विविध संस्थात्मक गुंतवणूकदारांना भेटण्यात व्यस्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button