क्रिडापुणे

आनंदयात्री या फेसबुक समुहातर्फे AYPL जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन

पुणे  | फेसबुक आणि इतर समाज माध्यम विश्वातील अगदी पहिला असा एक आगळा-वेगळा भव्य उपक्रम म्हणजे आनंदयात्री प्रिमियर लीग (एवायपीएल) लवकरच पुण्यात होणार आहे.उच्च विद्या विभुषीत राम चिंचलीकर आणि शुभदा ताकभाते संचलित आनंदयात्री या फेसबुक समुहातर्फे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 20 आणि 21 नोव्हेंबरला पुण्यात कर्वेनगरला गेम आॕन स्पोर्ट्स क्लब येथे या स्पर्धा होतील.एलिगंट रिअॕलिटी डेव्हलपर प्रायवेट लिमिटेड आणि राजेश व्यास ग्रुप हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. पुण्याव्यतिरिक्त मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा तसेच विदर्भ असे एकूण 16 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत.सोशल मिडियाद्वारे एकत्र आलेल्या समूहातील पुरुष आणि महिला मिश्र सांघिक स्पर्धा होणारा असा हा पहिलाच भव्य आणि विशेष सोहळा असल्याचे समूहाचे संचालक राम चिंचलीकर यांनी नमूद केले. विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच अनेक सेलिब्रिटीज ही या ठिकाणी सदिच्छा भेट देणार आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस नगरसेवक सुशील मेंगडे यांच्या शुभहस्ते बक्षिस वितरण होणार आहे, असेही चिंचलीकर यांनी सांगितले.

आनंदयात्री फेसबुक समुहाचा हा पुढाकार आणि उपक्रम अतिशय आवडला म्हणूनच प्रायोजक म्हणूनही आम्ही यामधे सामिल झालो आहोत. या सोहळ्याबाबत आम्ही खूपच उत्सुक आहोत, असे राजेश व्यास ग्रुपच्या संचालिका वैशाली व्यास यांनी सांगितले.

या कोव्हिड काळात एकंदरीत बदललेल्या जीवनशैलीने सगळ्यांनाच मनस्ताप होत होता. अशा वेळेस खुंटलेला संवाद नव्याने सुरू व्हावा, प्रत्येकाला व्यक्त होता यावं आणि स्वतःतील सुप्त गुणांना वाव देता यावा या उद्देशाने या समूहाची निर्मिती केली. आणि अगदी मोजक्या काळात गृहिणी, शिक्षक , वकील, कायदेतज्ञ, वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ, पोलीस क्षेत्रातील मान्यवर तसेच सिनेजगतातील नावाजलेली व्यक्तीमत्वे समूहात जोडली गेली. आणि आज केवळ एक फेसबुक समूह न रहाता आनंदयात्री हे 3,500 हून अधिक सभासदांचे एक परिपूर्ण कुटुंब म्हणून वाढत आहे याचा मनस्वी आनंद आहे असे संचालिका शुभदा ताकभाते यांनी सांगितले.

गाण्याचे कार्यक्रम, सिने विश्वातील मान्यवरांच्या मुलाखती असे मनोरंजक, आरोग्य विषयक माहितीसत्र असे आॕनलाईन उपक्रम समूहात राबवले गेले. कोव्हिड नियमांचे पालन करत जिल्हा स्तरीय स्नेह मेळावे आयोजित केले गेले. सामाजिक बांधिलकी जपत आनंदयात्री समूहा तर्फे मोफत लसीकरण उपक्रम ही पार पाडण्यात आले. आता एवायपीएल् हा जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धा हा अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक उपक्रम पुण्यात होत आहे. सामाजिक किंवा आर्थिक स्तर बाजूला ठेवून परस्परातील सामंजस्य आणि मैत्र वृद्धिंगत व्हावे हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे आनंदयात्रीचे संचालक राम चिंचलीकर आणि शुभदा ताकभाते यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button