पिंपरी / चिंचवडपुणे

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त प्रदर्शनीद्वारे वीज ग्राहकांचे प्रबोधन

पुणे l प्रतिनिधी

राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून महावितरणच्या पुणे परिमंडलाकडून वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच महावितरणची ग्राहकसेवा, वीजसुरक्षा, वीजबचतीबाबत माहितीपत्रक वितरीत करण्यात आले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 24) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने प्रदर्शनी लावण्यात आली. यामध्ये महावितरणकडून लावण्यात आलेल्या प्रदर्शनीद्वारे वीजग्राहकांचे प्रबोधन करण्यात आले. महावितरणचे मोबाईल अॅप, ऑनलाइन वीजबिल भरणा, नवीन वीजजोडणीसह वीजबिलांच्या नावामध्ये बदल, पर्यावरणपुरक गो-ग्रीन योजना आदींसह वीजसुरक्षेचे महत्व व खबरदारी, वीजबचतीचे उपाय आदींबाबत प्रदर्शनीला भेट दिलेल्या वीजग्राहकांना माहिती देण्यात आली. तसेच संबंधीत माहितीचे पत्रकही वितरीत करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी या प्रदर्शनीला भेट दिली व महावितरणच्या मोबाईल अॅपबाबत सविस्तर माहिती घेतली. अॅपद्वारे एका क्लिकवर सर्व सेवा मिळत असल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी समाधान व्यक्त केले. या सोबतच अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार व प्रकाश राऊत यांनी देखील प्रदर्शनीला भेट देत वीजग्राहकांशी संवाद साधला.

दिवसभराच्या या प्रदर्शनीमध्ये ग्राहक सुविधा केंद्रांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. भरणे व राकेश महाजन, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी व ग्राहक सुविधा केद्रांतील कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या ग्राहकसेवेची माहिती दिली. या प्रदर्शनीच्या आयोजनासाठी कार्यकारी अभियंता सर्वश्री अनिल गेडाम, भागवत थेटे, अमित कुलकर्णी आदींनी सहकार्य केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button