TOP Newsक्रिडा

ऑस्ट्रेलियाने प्रथमच पटकावला टी-२० विश्वचषक ; न्यूझीलंडवर अंतिम फेरीत आठ गडी राखून वर्चस्व

ऑस्ट्रेलियाच्या संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत न्यूझीलंवर मोठा विजय साकारला आणि पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाला गवसणी घातली. यापूर्वी २०१० साली ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या फायटनलमध्ये पोहोचला होता, पण यावेळी त्यांना उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने संघाला फक्त तारले नाही तर मोठी धावसंख्या उभारून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. धमाकेदार फटकेबाजी करत विल्यम्सनने ८५ धावांची धडेकाबाज खेळी साकारली. विल्यम्सनच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला विश्वविजयासाठी १७३ धावांचे आव्हान देता आले. न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी अर्धशतक झळकावले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकता आला.

न्यूझीलंडच्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कारण तिसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला बाद केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. पण हा आनंद न्यूझीलंडसाठी जास्त काळ टिकला नाही. कारण त्यानंतर वॉर्नर आणि मार्श यांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. बोल्टने यावेळी वॉर्नरला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. वॉर्नरने यावेळी ३८ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. वॉर्नर बाद झाला असला तरी मार्शने मात्र फटकेबाजी सुरुच ठेवत आपले अर्धशतकही साकारले.

न्यूझीलंड टॉस हरला आणि त्यामुळे त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागली. डॅरिल मिचेलने ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच ेचंडूवर षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. पण त्यानंतरच्या षटकात मिचेल ११ धावांवर बाद झाला. मिचेल बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज आग ओकत असताना केन आणि सलामीवीर मार्टिन गप्लिल शांतपणे फलंदाजी करत होते. केनन ११ चेंडूंपर्यंत शांत राहीला आणि त्यानंतर त्याने मोठी फटकेबाजीला सुरुवात केली. यावेळ केनना गप्तिलही चांगली साथ देईल, असे वाटत होते. पण त्यामध्ये गप्तिल अपयशी ठरला. अॅडम झाम्पाने यावेळी गप्तिलला २८ धावांवर बाद केले आणि न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. गप्तिल बाद झाला असला तरी केनने मात्र आपला गिअर बदलला नाही. आजच्या सामन्यात केन हा वेगळाच फलंदाज असल्याचे दिसत होते. कारण केन एवढा आक्रमक खेळत असल्याचे यापूर्वी पाहिले नव्हते. पण केनने यावेळी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा खरपूस सचामार घेतला आणि न्यूझीलंडचा धावगती वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलला. मिचेल स्टार्कच्या १६व्या षटकात तर केनने चक्क चार चौकार आणि एक षटकार वसूल केला. या एकाच षटकात केनने २२ धावा लुटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतरही केन आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. केनने यावेळी ४८ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ८५ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button