breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

पंढरपूर – आज नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यासाठी तुळस, शेवंती, झेंडू, अश्टर, जरबेरा, कागडा, कामिनी आणि गुलाब या फुलांचा वापर करण्यात आला आहे. बीडचे विठ्ठलभक्त करण हनुमान पिंगळे यांच्या वतीने मंदिराला फुलांची ही सजावट करण्यात आली, अशी माहिती पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिली.

विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराचा गाभारा, सभामंडप, मंदिराचे खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. त्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट केल्यामुळे आणखी भर पडली आहे. कोरोनाच्या संकटामुळे बंद असलेली मंदिरे नवरात्रीपासून दर्शनासाठी खुली झाली आहेत. त्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button