breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या मुलाच्या विवाहाला मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांचा मुलगा ऋषिकेश वाघेरे-पाटील यांचा विवाह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

लोणावळा येथील हॉटेलमध्ये कोविड नियमांचे पालन करीत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वाघेरे-पाटील आणि साखरे कुटुंबियांनी विवाह सोहळा आयोजित केला होता.
हिंजवडी येथील म्हाबोबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त यशवंत साखरे यांची कन्या स्नेहा साखरे आणि ऋषिकेश वाघेरे-पाटील यांचा विवाह मंगलमय वातावरणात संपन्न झाला.
ऋषिकेश हे माजी महापौर स्व. भिकू वाघेरे-पाटील यांचे नातू आणि राष्ट्रवादीच्या विद्ममान नगरसेविका उषा वाघेरे-पाटील यांचे सुपुत्र आहेत. तसेच, स्नेहा या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत साखरे यांच्या पुतणी आणि हिंजवडीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य विक्रम साखरे यांच्या चुलत बहीण आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवा नेते पार्थ पवार, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक अजित गव्हाणे, नाना काटे, मयूर कलाटे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांनी वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील मातब्बर कुटुंबांपैकी एक अशी वाघरे-पाटील कुटुंबाची ओळख आहे. तसेच, हिंजवडी गावच्या राजकारणात साखरे कुटुंबियांचा विशेष दबदबा आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याला सर्व पक्षीय मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button