breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

“देशात आणि परदेशात कॅव्हॅक्सिन बदनाम करण्याचे प्रयत्न केले गेले”

नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
कोरोना संसर्गाच्या लाटेत विरोधी पक्षांनी देशात बनवलेल्या लसीबाबत साशंकता व्यक्त केली होतीच. पण सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात बनवलेल्या कोवॅक्सिन या कोरोना लसीला जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी नसावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले असल्याचा गौप्यस्फोट आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनव्ही रमना यांनी केला आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे यापूर्वी आयोजित रामनेनी फाऊंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली.

सीजेआय म्हणाले, फायझरसारख्या अनेक बहुराष्ट्रीय मल्टिनॅशनल कंपन्यांनकडून कोवॅक्सिनला भारतात बदनाम करण्याचे अवास्तव प्रयत्न झाले. डब्ल्यूएचओकडे तक्रार करून भारतात बनवलेल्या लसीची मान्यता थांबवण्याचा प्रयत्न केले गेले, असल्याचे सांगितले. दरम्यान, भारताच्या सरन्यायाधीशांनी भारत बायोटेकच्या अँटी-कोविड लस कोवॅक्सीन आणि कंपनीच्या निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. ते म्हणाले की, स्वदेशी बनावटीची कोवॅक्सीन प्रभावी असल्याचे विविध अभ्यासकांनी सांगितले होते. मात्र ती देशातच बनवण्यात आल्याने अनेकांनी त्याला विरोध केला. काहींनी याविरोधात डब्ल्यूएचओ कडे तक्रार केली होती.

सीजेआय म्हणाले, “लस उत्पादक भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक, कृष्णा एला आणि त्यांची पत्नी सुचित्रा यांनी या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला होता. अशा लोकांचे महान कार्य जगासमोर यायला हवे. पण ते होत नाही. तेलुगू भाषिक लोकांमध्ये त्यांच्या महान कामगिरीनंतरही तेलगू लोकांना कमी लेखण्याची प्रवृत्ती आहे. अशी प्रथा किंवा गुलामगिरीची मानसिकता नष्ट झाली पाहिजे, असे ते म्हणाले. आई, मातृभाषा आणि मातृभूमीचा आदर करण्याची परंपरा चालू ठेवण्यावर त्यांनी भर दिला. सरन्याशीश रामण्णा यांनी भारत बायोटेकचे संस्थापक कृष्णा एल आणि सुचित्रा यांना फाऊंडेशनकडून पुरस्कार देण्यात आला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button