ताज्या घडामोडीपुणे

सराईत गुन्हेगाराचा पोलीस चौकीतच आत्महत्येचा प्रयत्न

पुणे | एका सराईत गुन्हेगाराने मद्यप्राशन करून पोलीस चौकीत येऊन आरडाओरडा करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वारजे पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या वारजे चौकीत ही घटना रविवारी घडली. मंगेश विजय जडितकर (वय 21, पारुदत्त कॉम्प्लेक्स, दांगट पाटील, नगर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जनार्दन होळकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. रविवारी फिर्यादी हे वारजे पोलिस चौकीत कर्तव्य बजावत असताना आरोपी दारूच्या नशेत त्या ठिकाणी आला. मोठमोठ्याने आरडाओरडा करत “माझी तक्रार घ्या, मला ओळखत नाही का, मी गुन्हेगार आहे, मला मंगेश जडितकर म्हणतात, मी आता जीव देतो” असे म्हणत होता. त्यावेळी फिर्यादी त्याला समजावून सांगण्यासाठी गेले असता त्याने पोलीस चौकीच्या खिडकीच्या काचा हाताने फोडल्या आणि स्वतः जखमी झाला.

त्यानंतर चौकी समोरच मार्शल ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचार्‍याच्या दुचाकीवर धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. वारजे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button