breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अधिवेशन सुरू असतानाच महिलेचा विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई | प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच आज सकाळी एका महिलेने विधानभवनाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे काही वेळ विधानभवनाबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. महिला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. रामपल्ली पिल्ले असे आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या महिलेचे नाव असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही महिला नाशिकहून मुंबईला आली होती. तिने तेथील पोलीस आयुक्तांवर काही गंभीर आरोप केले आहेत. ही महिला एका संघटनेची कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आज सकाळी अचानक पिल्ले या विधानभवनाबाहेर आल्या. त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पिल्ले यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांवर काही आरोप केले. आपल्या कुटुंबीयांवर जाणूनबुजून काही आरोप करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे त्या यावेळी म्हणाल्या. मी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आले आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना अभय दिले आहे आणि आमच्या कुटुंबावर जाणूनबुजून गुन्हे दाखल केले आहेत. ते आरोप जाणीवपूर्वक लावले आहेत, असा आरोपही त्यांनी केला. अनेकदा पोलीस आयुक्तालयात गेले. मात्र, माझे काहीही म्हणणे ऐकून घेतले जात नाही, असेही आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍या पिल्ले या म्हणाल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले तेव्हा मला सोडा, जाऊ द्या. मी इथे न्याय मागण्यासाठी आले आहे. मी तुम्हाला सहकार्य करते, मला प्रसारमाध्यमांशी बोलू द्यावे, असेही त्या यावेळी म्हणताना दिसल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button