ताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिकेची 99 लाख रुपयांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

पुणे | पुणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून कामे झाल्याचे दाखवत तब्बल 99 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महापालिकेचे अधिकारी प्रल्हाद पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश चंद्रशेखर मोरे याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 फेब्रुवारी ते 21 ऑक्टोबर या कालावधीत हा प्रकार घडला.पुणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. या सभेत विरोधकांनी सत्ताधारी भाजपला व प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर महापालिकेच्या वतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी, बाणेर, नवी पेठ आणि कोथरूड येथील महापालिकेच्या स्मशानभूमीत विद्युत विषयक कामे केल्याचे दाखवून 99 लाख आठ हजार रुपयांची बनावट बिले तयार करण्यात आली होती. त्यानंतर मनपाचे सर्व साधारण फॉर्म बिल तयार करून त्यावर संबंधित अधिकाऱ्याच्या बनावट सह्या व शिक्के मारून परस्पर कार्यालयीन जावक करून आरोग्य विभागाकडे ही बिले पाठवण्यात आली होती. ही बिले मंजूर करून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button