पिंपरी / चिंचवडपुणे

‘मला तुझ्या नव-यासोबत लग्न करायचं आहे’ म्हणत महिलेवर जीवघेणा हल्ला

पिंपरी l  प्रतिनिधी

‘तुझ्या नवऱ्यावर माझे प्रेम आहे. तू त्याला सोड. मला तुझ्या नव-यासोबत लग्न करायचं आहे’ अशी एका महिलेला धमकी देत दुसऱ्या महिलेने चाकूने वार करत जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. हा प्रकार 14 ऑगस्ट रोजी चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या क्वार्टर्समध्ये घडला.

याप्रकरणी जखमी महिलेने सोमवारी (दि. 6) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हल्ला करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला चाकण ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात असलेल्या स्टाफ क्वार्टर्समध्ये राहते. 14 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी घरी असताना आरोपी महिला पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात आली. घरात येऊन आरोपी महिलेने फिर्यादी महिलेच्या तोंडावर, हातावर, गळ्यावर चाकूने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात फिर्यादी महिला गंभीर जखमी झाली.

आरोपी महिलेने ‘माझे तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे. तू त्याला सोड. मला त्याच्या बरोबर लग्न करायचे आहे. नाहीतर मी तुला जीवे ठार मारल्याशिवाय सोडणार नाही’ अशी फिर्यादीला धमकी दिली. फिर्यादीने घडल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यास त्यांच्या दोन मुलींना देखील ठार मारण्याची धमकी दिली. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button