पिंपरी / चिंचवड

म्हाळुंगे येथे सोन्या चांदीच्या दागिन्यांसह देवांच्या चांदीच्या मूर्ती चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

म्हाळुंगे येथे एका चोरट्याने घरफोडी करून घरातून सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची गणपती आणि कृष्णाची मूर्ती देखील चोरट्याने चोरून नेली. ही घटना 28 ऑक्टोबर 2021 ते 8 जानेवारी 2022 या कालावधीत घडली.

अक्षय अंबादास गवारे (वय 20, रा. सुसगाव. ता मुळशी, पुणे. मूळ रा. परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रसेन अरविंद पाटील (वय 40, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना आरोपीने किचनच्या बाल्कनीतील डकमधील दरवाजातून घरात प्रवेश केला. घरातून सोन्या-चांदीचे दागिने, गणपतीची चांदीची मूर्ती, कृष्णाची चांदीची मूर्ती असा एकूण एक लाख 76 हजरांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button