पिंपरी / चिंचवड

तांबे शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात

पिंपरी l प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक 27 मधील तांबे शाळेकडे जाणा-या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम अनेक अडचणींमुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत होते. आमदार लक्ष्मण जगताप यांनी याप्रकरणी लक्ष घालून अडचणी दूर करत रस्त्याचे काम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. आता ही काम अंतिम टप्प्यात आहे.

या मार्गावर शिवगणेश कॉलनी, शिवराज कॉलनी, ज्ञानगंगा सोसायटी, नम्रता क्रिस्टल पार्क सोसायटी, वर्धमान अंगण सोसायटी, श्री दत्त कॉलनी, बल्लाळेश्वर सोसायटी, श्री अपार्टमेंट अशा विविध सोसायटी व कॉलन्या मिळून सुमारे 700 ते 800 कुटुंब वास्तव्यास आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्यांना अनेक समस्या व अपघातांना सामोरे जावे लागत होते.

रहिवाशांनी एकत्र येऊन आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली अडचण मांडली. त्यानंतर आमदार जगताप यांनी या रस्त्याचे काम कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ग प्रभागाचे माजी अध्यक्ष विद्यमान नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांना दिल्या.

आमदार जगताप यांच्या सूचनेनुसार परिसरातील नागरिकांशी तात्काळ चर्चा करून व महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कामासंदर्भात चर्चा केली. व तातडीने या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. रस्त्याचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असून येत्या दोन ते तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनामुळे या कामातील सर्व अडचणी दूर होऊन हे काम पूर्ण झाल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

या सर्व कामात भिकोबा तांबे शाळेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू तांबे यांचे मोठे सहकार्य लाभले. यापुढेही आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असल्याचे नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button