breaking-newsमहाराष्ट्रराजकारण

ईदला परवानगी दिवाळी पहाटला नाही, असा प्रश्न विचारताच मनसे आमदाराचा ठाकरे सरकारला टोला, म्हणे…

मुंबई |

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. करोना नियमांअंतर्गत दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांच्या आयोजनाला संमती न दिल्यामुळे पाटील यांनी नाराजी व्यक्त केलीय. ईदनिमित्त प्रशासनाने परवानगी दिलेली मात्र दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राजकारण होतं असं वाटतंय का असा प्रश्न विचारण्यात आला असता राजू पाटील यांनी, स्वत:च्या हातून सुंता केलेल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची?, असा उलट प्रश्न विचारला. राज्य सरकारने दिवाळीमध्ये मात्र निर्बंध घालत दिवाळी पहाटेच्या कार्यक्रम रोखले आहेत. यावर व्यक्त होताना मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी विद्यमान सरकारने स्वताच्या हातून स्वताची सुंता केली आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार असा सवाल करत राज्य सरकारच्या दररोज बदलणाऱ्या करोना नियमावर घणाघाती टीका केली.

दिवाळी पहाट आणि फडके रोड यांचे डोंबिवलीकरांसाठी अनोखे नाते असून तरुणाईच्या उपस्थितीने दरवर्षी फडके रोड नव्याने बहरतो. मात्र करोना काळात फडके रोडवर जमावाला एकत्र जमण्यास मनाईचे आदेश देण्यात आले आहेत. यंदा राज्य सरकारने करोना रुग्ण कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले असल्याने मनसेने फडके रोड वर दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते मात्र या कार्यक्रमाला पोलिसांनी स्थगिती दिली. त्यामुळे हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले नाट्यगृहात पार आहे. मात्र दिवाळीनिमित्त मनसेच्या वतीने आप्पा दातार चौकात विद्युत रोषणाई करण्यात केली असून ही रोषणाई जनतेसाठी करण्यात आली असून काही लोकांना त्यातही राजकारण दिसत असेल त्याला काय करणार? असा सवाल आमदार मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी विचारला आहे.

तसेच मनसेने आयोजित केलेल्या आपल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारणे हा पोलिसाचा दोष नसून ते सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे सांगत पाटील यांनी कार्यक्रम रद्द होण्यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे. प्रत्येक ठिकाणी मनसेला विरोध करणाऱ्या शिवसेनेला टोला मारताना त्यांनी स्वत:ची लाईन मोठी करा, इतरांची लहान करून काय मिळणार असा सवाल पाटील यांनी केला. ईदच्या गर्दीकडे दुर्लक्ष करत हिंदूंच्या महत्वाच्या दिवाळी सणावर बंधने घालणाऱ्या सरकारने स्वत:ची सुंता केली असून त्यांच्याकडून हिंदूंच्या सणांचे पावित्र्य राखण्याची अपेक्षा काय ठेवणार असा थेट हल्लाबोल पाटील यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button