पिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

ऐकावं ते नवल : स्वयंपाक नीट बनवला नाही म्हणून पतीने घेतला पत्नीच्या पाठीचा चावा

पिंपरी l प्रतिनिधी
पत्नीने स्वयंपाक नीट बनवला नाही, म्हणून पती पत्नीच्या पाठीला जोरात चावला. यात पत्नी जखमी झाली. पत्नीने थेट पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. हा प्रकार सोमवारी (दि. 20) रात्री अकरा वाजताच्या सुमारास गव्हाणे वस्ती भोसरी येथे घडला आहे.

गणेश भगवान गव्हाणे (वय 56, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी 51 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. 21) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश हा दारू पिऊन फिर्यादी पत्नीला वारंवार त्रास देतो. त्याने अनेकदा फिर्यादीला दारू पिऊन मारहाण केली आहे. सोमवारी देखील तो दारू पिऊन घरी आला. जेवण करत असताना त्याला जेवण आवडले नाही. रात्री अकरा वाजता त्यांच्यात भांडण सुरु झाले.

भांडण विकोपाला जाऊन गणेश याने पत्नीच्या पाठीत जोरात चावा घेतला. यामध्ये फिर्यादी जखमी झाल्या. त्यांनतर गणेश याने मुलीला देखील शिवीगाळ करून मारहाण केली. सतत होणा-या मारहाणीला कंटाळून फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button