TOP Newsताज्या घडामोडीपुणे

परदेशातून पुण्यात आलेल्या तब्बल 1000 प्रवाशांचा थांगपत्ता लागेना

पुणे | ओमायक्रॉन च पार्श्वभूमीवरती परदेशातून येणाऱ्या नागरिकांचे ड्रेसिंग करून त्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे रुग्ण आढळलेल्या देशातून सुमारे 3 हजार 200 प्रवासी पुण्यात आले असून त्यातील 2 हजार 200 ड्रेसिंग करून करोना चाचणी करण्यात महापालिकेला यश आलेला आहे. तर तब्बल1 हजार नागरिकांचा शोध अध्याप महापालिकेला लागलेला नाही

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी पथकांची निर्मिती

आफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंटचा संपूर्ण जगाने आता धसका घेतला असून, आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावरही बऱ्याच देशांनी निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आता ज्या ज्या शहरात परदेशातून नागरिक येत आहेत, त्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारकच करण्यात आले आहे. पुण्यातही परदेशातून आलेल्या सुमारे 3200 जणांची यादी महापालिकेकडे आहे, त्यांचेही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यासाठी पालिकेकडून पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

१२०० जणांची शोधून टेस्ट

परदेशांतून आलेल्या ७५० जणांची विमानतळावरच टेस्ट करण्यात आली असून, १,२०० जणांचे घरी आल्यानंतर महापालिकेने त्यांना शोधून त्यांची टेस्ट केली आहे. दरम्यान, पुणे मुंबई आणि नागपूर विमानतळांवर परदेशांतून नागरिक येतात. ज्या देशांत ओमायक्रॉन रुग्ण आढळलेले आहेत, अशा देशांतून या तीनही विमानतळांवर दि. १ डिसेंबरपासून आतापर्यंत ११ हजार ७५१ प्रवासी पुण्यात आले. तर, इतर जोखमीचे नसलेल्या देशांतून ६५ हजार ७७९ प्रवासी आले आहेत, असे महापालिका आरोग्य प्रमुख आशिष भरती यांनी सांगितले.

जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले १०७ नमूने

जोखमीच्या देशांतून आलेल्यापैकी २२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर इतर देशातून पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या ८ आहे. क्षेत्रीय सर्वेक्षणातून ७७ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले असून सर्व मिळून १०७ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग करण्यासाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. यापैकी आतापर्यंत २० रुग्णांचे नमुने ओमायक्रॉनसाठी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर २० नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button