breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत 144 कलम लागू;न्यू इयर पार्टी करता येणार नाही

मुंबई | प्रतिनिधी
मुंबई कोरोना व्हायरसच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटने आता मुंबईकरांची चिंता अधिक वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे तब्बल 2,510 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने मुंबईत कलम 144 लागू केले आहे. तसेच मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे. यासोबतच नववर्ष साजरे करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

वृत्तसंस्थेनुसार, प्रशासनाने मुंबईत 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत कलम 144 लागू केले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यास बंदी असेल. 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट आणि क्लबमध्ये कोणतीही पार्टी करता येणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button