पिंपरी l प्रतिनिधी
चाकण येथील जनावरांच्या बाजारातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणा-या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 12) सकाळी साडेनऊ वाजता करण्यात आली.
मोहसीन कादर बैग (रा. मंगळवार पेठ, जुन्नर, पुणे) याला अटक केली आहे. त्याच्यासह शाबीर नन्नूपटेल कुरेशी (रा. मंगळवार पेठ, जुन्नर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी योगीराज सुरेश करवंदे (वय 23, रा. राजगुरूनगर, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चाकण येथील जनावरांच्या बाजारातून विनापरवाना कत्तलीसाठी तीन गायी आणि दोन कालवड अशी पाच जनावरे एका टेम्पोत भरली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून पाच जनावरांची सुटका करत आरोपी मोहसीन याला अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी पाच लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.