breaking-newsTOP NewsUncategorizedक्रिडामहाराष्ट्रमुंबई

अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण

मुंबई । महाईन्यूज ।

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आहे. अर्जु तेंडुलकर हा मुंबईचा राहणारा असून, त्याने मुंबईच्या संघातून पदार्पण न करता गोव्याच्या संघातून पदार्पण केले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले आहे. अर्जु तेंडुलकर हा मुंबईचा राहणारा असून, त्याने मुंबईच्या संघातून पदार्पण न करता गोव्याच्या संघातून पदार्पण केले आहे. रणजी ट्रॉफीचा २०२२-२३ सीझन मंगळवारपासून सुरू झाला आहे. या सामन्यात अर्जुन तेंडुलकर गोवा संघाकडून खेळण्यासाठी आला होता.

अर्जुन तेंडुलकरने या सीझनपूर्वी मुंबई संघ सोडत गोवा संघाकडून खेळण्याचे निश्चित केले होते. गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर याच सामन्यात अर्जुन तेंडुलकरने गोवा क्रिकेट संघामधून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. २३ वर्षीय अर्जुन तेंडुलकरचा गोवा क्रिकेट संघामध्ये प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला. आणि पहिल्याच दिवशी त्याला फलंदाजी करण्याचीही संधी मिळाली.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अर्जुन तेंडुलकर ४ धावांवर नाबाद राहिला आहे. त्याने आतापर्यंत १२ चेंडू खेळले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवसाबद्दल बोलायचे तर गोव्याने आतापर्यंत ५ गडी गमावून २१० धावा केल्या आहेत. गोव्याकडून सुयश ८१ धावांवर नाबाद राहिला, तर स्नेहलने ५९ धावा केल्या.
दरम्यान, अर्जुन तेंडुलकरने यावर्षी ऑगस्टमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी अपील केले होते, ज्यात त्याने NOCची मागणी केली होती. अर्जुनला मुंबईच्या संघातून खेळण्याची संधी मिळत नव्हती, त्यामुळे त्याने गोवा संघातून खेळण्याचे ठरवले आणि इथून त्याला पहिल्याच सीझनमधून पदार्पणाची संधी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button