ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरासमोर बसलेल्या लोकांसोबत वाद, 10 जणांवर गुन्हा

पिंपरी चिंचवड | गोंधळाच्या कार्यक्रमासाठी घरसमोर बसलेल्या लोकांसोबत झालेल्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथे गुरुवारी (दि.18) रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.याप्रकरणी विशाल गोपाळ शिंदे (वय 30, रा. थेरगाव फाटा, थेरगाव) यांनी शुक्रवारी (दि.19) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर शिंदे, गणेश तुपे, शंकर लोंढे, आदित्य शिंदे, संदीप शिंदे, चैतन्य शिंदे, विशाल तुजारे, रोहण लोंढे, सागर बारणे, श्रीकांत थोरात यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 324, 143, 147, 149, 504, 506 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांच्या घराजवळ गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता, यावेळी फिर्यादी यांच्या घरासमोर लोक बसले होते. फिर्यादी यांना घरात जाण्यासाठी रस्ता देण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीत आरोपींनी जमाव गोळा करून फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच, दोन आरोपींनी फिर्यादी यांच्या भावाला खूर्चीने मारहाण केली आणि पोलीस तक्रार केल्यास पाहून घेऊ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button